पुणे – लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. शनिवारी (दि. ९) झालेल्या लोकअदालतमध्ये १ लाख ८९ हजार ०२३ दावे निकाली काढण्यात आले आहेत.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी.नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ११७ पॅनेलची नेमणूक करण्यात आली होती. त्या माध्यमातून विविध न्यायालयांत प्रलंबित ३३ हजार ३५९ प्रकरणे आणि दाखलपूर्व १ लाख् ५५ हजार ६६४ प्रकरणे अशी एकूण १ लाख ८९ हजार ०२३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
त्यातून ३६२ कोटी, ३१ लाख, ३७ हजार ३५४ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.