पुणे -करोना प्रतिबंधक लसींचे सोमवारी केवळ “कोवॅक्सिन’चेच डोस मिळणार असून, “कोविशील्ड’चे डोस संपले आहेत. “कोवॅक्सिन’चाही ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे, त्यांनाच तो मिळणार आहे.
करोना प्रतिबंधक लसींचे सोमवारी 15 केंद्रांवर प्रत्येकी 100 या प्रमाणे केवळ दीड हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
“कोवॅक्सिन”च्या दुसऱ्या डोसची मुदत 28 दिवसांनीच असल्याने दि. 3 मे पूर्वी ज्यांनी “कोवॅक्सीन’चा डोस घेतला आहे, त्यांना सोमवारी लस मिळू शकणार आहे. यासाठी नोंदणीची गरज नसून, “वॉक इन’ पद्धतीने ही लस घेता येणार आहे.