मुंबई – अभिनेता सोनू सुदने करोनाकाळात अनेकांना मदर केली आहे. त्याने केलेल्या मदतीचे देशभरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान सोनू सुदने एक पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यातील संघर्षाच्या दिवसाची कहानी सांगितली आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळात स्टार डस्ट या चित्रपट मासिकाने
मला नाकारले होते. मात्र त्याच स्टार डस्ट मासिकाने आज माजी मुलाखत मुखपृष्ठावर छापली आहे. याविषयी सोनूने स्टार डस्ट मासिकाचे एप्रिल महिन्याच्या आवृत्तीचे कव्हर पेज शेअर करत ही माहिती दिली आहे.
There was a day when I had sent my pictures from Punjab for an audition of Stardust, but got rejected.
Today want to thank Stardust for this lovely cover.
Humbled ❣️🙏
@sumita11 @Stardust_Magna @vedishnaidu @ashok_dhamankar pic.twitter.com/lQj6CLgxg3— sonu sood (@SonuSood) May 30, 2021
सोनू सुद म्हणाला की, एक दिवस होता जेव्हा मी स्टारडस्टच्या ऑडिशनसाठी पंजाबहून माझे काही फोटो पाठवले होते. पण मला त्यावेळी नाकारले गेले. आज मला स्टारडस्टचे आभार मानायचे आहेत. की त्यांनी माझी मुलाखत मुखपृष्ठावर छापली. दरम्यान या मासिकाने ‘खरा हिरो सोनू सूदने इतर ‘रील’ हिरोकडून मोर्च काढला?’ सोनूच्या या कव्हर स्टोरीला असे खास कॅप्शनही दिली आहे.
सोनू सुद करोना महामाहीमध्ये गरजवंतांना मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. यामध्ये रुग्णालयातील बेड्स, ऑक्सिजन, करोनासाठी लागणारे औषधे यासारख्या अनेक बाबतीत तो मदत करतो आहे. त्याच्या या कामाची अनेकांकडून दखल घेण्यात आली आहे.