पुणे : महिलेने मित्राशी चॅटिंग ( whatsapp chat ) केल्याचा पुरावा महत्वाचा ठरला आहे. हा पुरावा ग्राह्य धरत तिने पतीकडे मागितलेल्या पोटगीचा दावा लष्कर येथील सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चं.ना.ओडरे यांनी फेटाळला. या निर्णयामुळे पतीला दिलासा मिळाला आहे. ( Pune Court )
प्रिया व राजेश (नावे बदललेली आहेत) यांचा विवाह सन 2016 रोजी झाला. दोघेही उच्चशिक्षित आहे. तो नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. लग्नानंतर जेमतेम तीन महिनेच संसार चालला. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. त्यानंतर २०१८ मध्ये तिने पती विरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला. पतीने शारीरिक व मानसिक छळ करून घरातून हाकलून दिल्याचे आरोप केले. ( court accept whatsapp chat )
पतीतर्फे अॅड.जयकुमार कदम यांनी न्यायालयात कामकाज पाहिले. न्यायालयासमोर पत्नीने पती विरुद्ध केलेल्या आरोपाचे खंडन करून पतीकडे तीन महिने कालावधीत राहायला असताना कोणतेही वैवाहिक संबंध तिने ठेवले नाहीत. ( Husband wife divorce ) याऊलट तिने तिच्या मित्राशी व्हाट्स अप चॅटिंग केल्याचे पुरावे सादर केले व पतीने कोणतेही शारीरिक व मानसिक छळ न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. भारतीय पुरावा कायदा कलम 65 ब चे प्रमाणपत्र देऊन व्हाट्स अप चॅटिंग पुरावा म्हणून सादर केले. ( husband wife )
फक्त व्हाट्स अप चॅटिंगवरून मानसिक व शारीरिक छळ झाला नाही असे दिसून येत नसल्याचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला. यामध्ये तिने मित्रासोबत केलेले व्हाट्स अप चॅटिंगचा पुरावा ग्राह्य धरला.
– अॅड. जयकुमार कदम, पतीचे वकील.