Vicky Kaushal : विकी कौशल ( Vicky Kaushal ) आणि राजकुमार हिरानी ( Rajkumar Hirani ) या अभिनेत्या-दिग्दर्शक जोडीमध्ये खरोखरच एक खास बंध आहे, जो आपल्याला ‘संजू’मध्ये स्पष्टपणे दिसला. विकीने त्याच्या अभिनयाने आणि अप्रतिम गुजराती उच्चारणाने चित्रपटातील त्याचे पात्र कमालीचे जिवंत केले होते. ही केवळ सुरुवात होती कारण प्रेक्षकांना ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा एकदा डंकीत ( Dunki ) आणखी एका मनोरंजक पात्रासह पहायला मिळणार आहे.
राजकुमार हिराणी यांनी शाम कौशलना म्हणजे विक्कीच्या वडिलांना सांगितले की डंकीत एक अतिशय खास भूमिका आहे जी त्याने विकीला ऑफर केली असती पण ती मुख्य भूमिका नसल्यामुळे विक्की कदाचित ती करणार नाही. त्याच दिवशी संध्याकाळी विकीने राजकुमार हिरानींना फोन केला आणि सांगितले,
मी तुमच्या चित्रपटात कोणतीही भूमिका करायला मी तयार आहे. माझ्याशिवाय दुसरे कोणीही ती भूमिका करणार नाही. आणि विकीला मिळाली डंकीमधली ती खास भूमिका. या व्यक्तिरेखेद्वारे विकी पुन्हा एकदा लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करणार आहे.