कोथरूड – नोकरी मिळाल्याचा आनंद तरूणांच्या चेहऱ्यावरील पाहिल्यावर खऱ्या अर्थाने वाढदिवस सार्थकी झाला असे वाटते. हा आनंद सनी आणि गिरीश यांनी दिला असून, असा स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे, असा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी सनी मानकर आणि कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, किशोर कांबळे, हर्षवर्धन मानकर उपस्थित होते. ऍड. वंदना चव्हाण यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
सनी आणि गिरीश हे नेहमी समाजाला उपयोगी असे उपक्रम घेत असतात, सध्या रोजगार महोत्सव ही गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले. या महोत्सवात 540 तरुणांनी रजिस्टेशन करून मुलाखती दिल्या. त्यातील 95 तरुणांना तत्काळ नोकरी मिळाली, तर अन्य तरुणांना दुसऱ्या फेरीत संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांनी दिली.