पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा अध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार आहे. अॅड. राहुल दिंडोकर, अॅड. जयश्री होले, अॅड. राणी कांबळे आणि अॅड. केतन कोठावळे यांच्यात ही निवडणूक होणार आहे.
ऑडीटर पदी अॅड. अजय देवकर यांची आणि दहा कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीसाठी शिवाजीनगर न्यायालयात 31 जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या 2 जागांसाठी तब्बल सहा जण नशिब अजमावत आहेत.
त्यामध्ये अॅड. गीतांजली बालवडकर, अॅड. जयश्री चौधरी-बिडकर, अॅड. अमेय देशपांडे, अॅड. संजय पाटणकर, अॅड. विश्वजित पाटील, अॅड. पुनम स्वामी-प्रधान यांचा समावेश आहे. तर सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत अॅड. राहुल कदम, अॅड. गंधर्व कवडे, अॅड. मकरंद मते या तीन उमेदवारांमध्ये होणार आहे.
खजिनदार पदासाठी अॅड. समीर बेलदरे आणि अॅड. प्रदीप चांदेरे निवडणूक रिंगणात आहेत. ऑडीटर पदी अॅड. अजय देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, अॅड. अमोल वडगणे, अॅड. प्रमोद नढे, अॅड. मयुरी कासट, अॅड. संजय खैरे, अॅड. रेश्मा चौधरी, अॅड. श्रध्दा जगताप, अॅड. राहुल प्रभुणे, अॅड. ऋषिकेश कोळपकर, अॅड. चंद्रसेन कुमकर आणि अॅड. सचिन माने या दहा जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. अमित गिरमे आहेत. अॅड. दिलीप जगताप, अॅड. माधवी पोतदार, अॅड. शरद कुलकर्णी, अॅड. कांताराम नप्ते आणि अॅड. सिध्देश्वर चौधरी उप निवडणूक अधिकारी आहेत.