नवी दिल्ली – न्युयॉर्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका महिलेच्या अंगावर दारूच्या नशेत लघुशंका केल्याचा आरोप असलेला शंकर मिश्रा याने आपल्यावरील आरोप अमान्य केला आहे. त्या महिलने स्वत:च स्वत:च्या सीटवर लघुशंका केल्याचा दावा त्याने केला आहे.
मिश्रा याची कोठडीत चौकशी करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली त्या मागणीला मिश्रा यांच्या वकिलाने विरोध दर्शवला. आपल्या अशिलाने कोणताही गुन्हाच केलेला नाही त्यामुळे त्याच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी कोर्टातील सुनावणीत सांगितले.
KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात, BCCI कडून …
दरम्यान याप्रकरणात संबंधित महिलेच्या वकिलांनी त्यांच्या या दाव्याचा जोरदार प्रतिवाद केला. ते म्हणाले की, आरोपीने केलेल्या अत्यंत घृणास्पद कृत्याबद्दल त्याला पश्चात्ताप होण्याऐवजी, त्याने पीडितेला आणखी त्रास देण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती कोर्टापुढे दिली आहे.