पुणे : येथील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात एका इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार शास्त्रीनगर चौक वाडीया बंगला गेट नंबर 8 येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.
यामध्ये काही कामगार जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले असल्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी सध्या मदत कार्य सुरू आहे.