पुणे – लायन्स क्लब ऑफ रहाटणी आणि लिओ क्लब ऑफ रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लायन्स क्लब ऑफ रहाटणी करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत परंडवाल क्रिकेट अकादमी, चंद्रोज् क्रिकेट अकादमी, 30 यार्डस् क्रिकेट अकादमी या संघांनी आगेकूच केली.
या स्पर्धेत साखळी फेरीत परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने कॅनन क्रिकेट क्लब संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कॅनन क्रिकेट क्लब संघाने 22 षटकात सर्वबाद 104 धावा केल्या. परंडवाल क्रिकेट अकादमी संघाने 17.2 षटकात 2 बाद 107 धावांसह पूर्ण करत स्पर्धेत विजय मिळवला.
दुसऱ्या लढतीत चंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने एसएनबीपी क्रिकेट अकादमी संघाचा 127 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 4 बाद 215 धावा धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना एसएनबीपी क्रिकेट अकादमी संघ 17.3 षटकात सर्वबाद 88 धावांत गारद झाला.
अन्य लढतीत 30 यार्डस् क्रिकेट अकादमी संघाने तिकोने क्रिकेट गुरूकुल संघाचा 23 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.