वाघोली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख पदी डॉ. सारिका किरण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना निवडीचे पत्र मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शुभधा मोरे, नेहा पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण, सक्रीयपणे पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचे डॉ.सारिका पवार यांनी सांगितले आहे.