पुणे (महाळुंगे इंगळे) – चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावात (Mahalunge Ingle) एका २४ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार (koyata atack) करून निर्घृन खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी महाळुंगे एमआयडीसी पोलीस (Mahalunge police) ठाण्याची पोलीस पथके दाखल झाली आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,रितेश संजय पवार (वय २४) या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम महाळुंगे पोलीस ठाण्यात सुरु आहे.(Pune Crime)
यामध्ये पाच ते सहा आरोपी असल्याची प्राथमिकमाहिती समोर आली आहे.रितेशचे मागील सहा महिन्यापूर्वी लग्न झाले असून त्याच्यामागे आई, वडील,पत्नी, भाऊ, बहीण असापरिवार आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत.