India vs Australia 2nd T20 Match Toss Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
पहिला टी-20 सामना ज्याप्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झाला होता,तेच काही या वेळीही पाहायला मिळेल. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांगारू संघ दोन बदलांसह या सामन्यात दाखल झाला आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, टाॅस जिंकला असता तर मी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असता. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
🚨 Toss Update 🚨
Australia elect to bowl in the 2nd T20I.
Follow the Match ▶️ https://t.co/nwYe5nO3pM#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/YlPPr0ppKK
— BCCI (@BCCI) November 26, 2023
दरम्यान, भारतीय संघाने पहिला T20 सामना दोन विकेट्सने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने शतक झळकावले होते तर भारताकडून सूर्यकुमार यादवने 80 धावा करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.