पुणे : कोंढव्यातील सुखवाणी कॉम्प्लेक्सच्या परिसरात पोलिसांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली बेकायदा अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी सोसायटीतील दुकानांकडे जाणारा वहिवाटीचा मार्ग कुंपण टाकून बंद केला आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड महिन्यापासून दुकानदारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या परिसरात सुखवाणी कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्था आहे. सोसायटीच्या इमारतीत सदनिका आणि दुकाने आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारात सुशोभीकरणाच्या नावाखाली पोलीस ठाण्यातील आधिकाºयांनी सोसायटीच्या जागेत अतिक्रमण करून बेकायदा तारेचे कुंपण बांधले आहे.
या भागातून ये-जा करण्यास पोलीस ठाण्यातील कर्मचारी रहिवासी तसेच दुकानात खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना मज्जाव करत असल्याची तक्रार सुखवाणी कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्थेकडून करण्यात आली आहे. याबाबत परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याक डे तक्रार अर्जही देण्यात आला आहे.
सोसायटीचे अध्यक्ष इरफान सय्यद, सोसायटीतील दुकानदार मजहर खान, भाऊ पाटणे, रौफ चव्हाण यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सुशोभीकरणाच्या नावाखाली बेकायदा अतिक्रमण करण्यात येत आहे. रंगरंगोटी, वृक्षारोपणाच्या नावाखाली बेकायदा अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार रहिवाशी आणि दुकानदारांनी केली आहे.
संबंधित जागा सोसायटीच्या मालकीची नाही. बांधकाम व्यावसायिकाने संबंधित जागा इमारत बांधण्यापूर्वीच रस्ता रूंदीकरणासाठी दिली आहे. या जागेचा वापर काही दुकानदार करत होते. पोलिसांनी या भागात सुशोभिक रण केले. तेथील कच्च्या रस्त्याची डागडुजी करून घेतली.
संबंधित जागा बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीला हस्तांतरित देखील केलेली नाही. या जागेबाबतची कागदपत्रे सोसायटीकडे नाहीत. पोलिसांनी सामंजस्याने मोकळ्या जागेचा प्रश्न सोडविणयचा प्रयत्न केला. या जागेचा वापर पोलीस आणि सोसायटीतील दुकानदारही करू शकतील, यासाठी रस्ता दुरूस्त करून घेतला, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.