पुणे : भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या 3 वर्षांच्या कार्यक़ाळाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला .
भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार संजय नाना काकडे, तसेच पुण्याचे विद्यमान, सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये संघटनेला बळकटी आणण्यासाठी महिला मोर्चा कशाप्रकारे काम करणार आहे हा आजच्या पहिल्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता.