नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने शुक्रवारी पक्षाच्या लोकसभा खासदार प्रनीत कौर यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी आपली पक्षातून हकालपट्टी का करू नये, याचे तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव तारिक अन्वर यांनी सांगितले की, पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख अमरिंदर राजा वॉरिंग आणि इतर नेत्यांकडून आलेल्या तक्रारींची शहानिशा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी पंजाबात भाजपला मदत करण्याचे काम केले होते, असा त्यांच्यावर आरोप होता.
त्या माजी केंद्रीय मंत्री आहेत, तसेच त्या माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी आहेत. प्रनीत कौर यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाकडे तक्रारी केल्या होत्या.
PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च
अमरिंदरसिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी भाजपला साथ देण्याचेच काम केले आहे, असे कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.