पुणे : अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड असोसिएशनच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. बाजार समितीच्या मुख्यालयासमोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फळे व भाजीपाला विभागातील जय शारदा गजानन मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली़. नादब्रह्म आणि पारंपरिक या दोन ढोलताशा पथकांत मिळून १०० ढोलवादक होते.
यावेळी श्रीरामाची आरती करण्यासाठी वाराणसीवरून तीन गुरुजींना निमंत्रित करण्यात आले होते़. जय शारदा गजानन मंदिराच्या परिसरात विशेष पूजा करण्यात आली़. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, मिलिंद हरगुडे, संचालक गणेश घुले, कार्यक्र्माचे आयोजक संचालक अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांच्या हस्ते आरती करण्यात आली़. दरम्यान, सुमारे पाच हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़