पुणे – टिळक चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी प्रभू श्रीरामांचे भव्य मूर्ती शिल्प साकारले. काथ्या आणि मातीच्या मदतीने उभारण्यात आलेले हे शिल्प पाहण्यासाठी पुणेकर रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
कांबळे यांच्यासह ३० कारागिरांनी प्रभू श्रीरामांचे हे शिल्प सकाळी १० वाजता तयार करण्यास सुरुवात करत सायंकाळी ५ वाजता पूर्ण केले. यासाठी जवळपास ५ हजार किलो शाडू मातीचा वापर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष प्रियाताई बेर्डे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कायदे तज्ज्ञ उल्हास बापट, पोलीस अधिकारी कल्याणी पाटोळे, जितेंद्र भुरुक, प्रिया गदादे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष विजय राम कदम, तेजल दुधाणे, महिला कार्याध्यक्ष सुनीता मोरे, शालिनी जगताप, युवक कार्याध्यक्ष आनंद सागर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.