पुणे – बेवारस वाहने जप्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. यात रस्त्यावर अनेक महिने पडून असलेली, नादुरुस्त वाहने उचलली जाणार आहेत. सदर वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होततो. त्याखाली कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
यापूर्वी रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आली आहे. या बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्याही तक्रारी सातत्याने प्राप्त आहे त्यामुळे सदर वाहने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करण्यात येत आहेत. जप्त केलेली वाहने रिमुव्हल चार्जेस भरून संबंधित वाहन मालक एक महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेता येणार आहे.
या वाहनांवर क्षेत्रीय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येत असून, यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी सात दिवसांच्या मुदतीत वाहन न हटवल्यास ते जप्त करण्यात येणार आहे.
व्हाॅट॒सअॅपवर करा तक्रार
पुणे महापालिकेमार्फत आतापर्यंत अशी १३९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. अशा वाहनांसाठी पुणे महापालिकेच्या मार्फत ९६८९९-३१९०० या व्हॉटस अॅप नंबर वर फोटो आणि लोकेशनसह तक्रारी पाठवण्यात याव्यात, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे