पुणे – निवडणूक खर्च वेळेतच सादर करा

जिल्हा निवडणूक अधिकारी राम यांचे आदेश

पुणे – उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च केला असल्यास तो खर्चात दाखवावा तसेच प्रचारा दरम्यान होणारा खर्च वेळेवर सादर करावा, असे आदेश अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणुकीसंदर्भात आयोगाच्या सूचना, आदर्श आचार संहिता, इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन याबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजीव श्रीवास्तव, रजत अग्रवाल, केंद्रीय खर्च निरीक्षक प्रियंका गुलाटी, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, निवडणूक खर्च व्यवस्थापनचे अजित रेळेकर, एक खिडकी योजनेचे सुहास मापारी, इव्हीएम व्यवस्थापनचे विजयसिंह देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम यांनी उपस्थितांचे शंका निरसन केले. निवडणूक खर्च आणि सोशल मिडीयावरील प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे दिली. जिल्हाधिकारी राम म्हणाले, उमेदवाराकडून निवडणुकी दरम्यान वेळोवेळी विविध प्रकारच्या परवानग्या, परवाने घेतले जातात. त्या अनुषंगाने रॅली, मेळावे, रेडिओ प्रक्षेपण, व्हीडीओ चित्रीकरण, दूरदर्शन प्रक्षेपण, पथनाट्य, मोबाईलवरील एसएमएस, फेसबुक, सोशल मिडीयाद्वारे प्रचारयंत्रणा राबविली जाते. अशावेळी उमेदवार किंवा उमेदवारांच्या खर्चासाठी नेमलेल्या प्रतिनिधीकडून निवडणूक कार्यालयाला खर्चाची माहिती दिली जात नाही. त्यामुळे हिशोबामध्ये चूक होऊन तफावत निर्माण होते, म्हणून परवानगी घेतल्याबरोबर झालेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लगेच दुस-या दिवशी असा खर्च खर्चाच्या नोंदवहीमध्ये सविस्तरपणे नोंदविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सूचीतील नेत्यांचा (स्टार कॅम्पेनर) प्रवासावरील खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या हिशेबामध्ये समाविष्ट करण्यातून सूट देता येईल, बाकी इतर सर्व खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरावयाचा आहे, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

उमेदवारांच्या खर्चाची होणार तपासणी
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बॅंक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रथम तपासणी, दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता द्वितीय तपासणी आणि दि.21 एप्रिल,2019 रोजी सकाळी 11 वाजता तृतीय तपासणी करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.