पुणे : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता 45 पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डंबरे, उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे, उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले. तर केंद्रीय राखवि पोलिस दलातील हवालदार सुनील दत्तात्रय काळे मरणोत्तर शौर्य पदक जाहीर करण्यात आले.
पुण्याच्या गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्त सुरेंद्र मधुकर देशमुख, दौंड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील उपनिरीक्षक संतोष जाधव, पुण्याच्या विशेष शाखेतील विजय नारायण भोसले आणि पॉल राज अँथनी, यांसह रेल्वे पोलीस दलातील निरीक्षक सुधीर पांडूरंग शिंदे आणि उप निरीक्षक भीमप्पा देवप्पा सागर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.