पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने शहर कॉंग्रेसच्या वतीने लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दांडी यात्रा, जरा याद करो कुर्बांनी, ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य चळवतील आंदोलने तसेच स्वातंत्र लढयातील नायक. हे या स्पर्धेचे विषय असणार असल्याची माहिती माजी आमदार दिप्ती चवधरी आणि शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली.
या महोत्सवासाठी प्रत्येक स्पर्धकाने एक ते तीन मिनिटाचा लघु चित्रपट बनवायचे असून प्रत्येक स्पर्धकाने आपली फिल्म shortfilmfestival.co.in या वेबसाईटवर टाकायची आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपली फ़िल्म युट्युब वर अपलोड करून त्याची लिंक आम्हाला 9423012711 या क्रमांकावर पाठवावी असे आवाहन तिवारी यांनी केले आहे. स्पर्धेतील बक्षीसे पहिल्या क्रमांकाला 31000 रुपये दुसऱ्या क्रमांकाला 21000 रुपये तिसऱ्या क्रमांकाला 11000रुपये दोन उत्तेजन्नार्थ पारितोषिके 5000 रुपये प्रमाणे असणार आहेत. या फिल्म 9 सप्टेंबर पर्यंत पाठवायच्या आहेत.