पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अनेक मार्गावर उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून पुणे ते संबळपूर आणि हडपसर ते गुवाहाटी या दोन मागार्वर ४० अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
पुणे-संबळपूर-पुणे (ट्रेन क्रमांक ०८३२८) ही साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १६ एप्रिल ते २ जुलै या दरम्यान दर मंगळवारी पुण्याहून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या तर संबळपूर-पुणे (ट्रेन क्रमांक ०८३२७) ही साप्ताहिक विशेष ट्रेन ३० जूनपर्यंत दर रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता सुटेल.
हडपसर-गुवाहाटी-हडपसर (ट्रेन क्रमांक ०५६०९) ही साप्ताहिक विशेष ट्रेन २७ जूनपर्यंत हडपसर येथून दर गुरुवारी सकाळी १० वाजता सुटेल. गुवाहाटीला तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पोहचेल. आहे. तर गुवाहाटी-हडपसर(ट्रेन क्रमांक ०५६१०) ही साप्ताहिक विशेष गाडी दि. ६ मे ते २४ जूनदरम्यान धावणार असून सोमवारी गुवाहाटी येथून रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती हडपसरला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.