पुणे – उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील पलवल-मथुरा जंक्शन येथे यार्ड रीमॉडलिंगसाठी आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्य यामुळे पुणे विभागातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वरील बदलाची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे आणि प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वे चौकशी प्रणालीवर गाडीची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.
पुणे ते जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (ट्रेन ११०७७) १० जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत रद्द आहे. जम्मूतावी जेलम एक्स्प्रेस ते पुणे (ट्रेन ११०७८) १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत रद्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन १२१४७) १६ आणि ३० जानेवारीला दोन दिवशी रद्द आहे. हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर (ट्रेन १२१४८) ११ जानेवारी, १८ जानेवारी १ फेब्रुवारी हे तीन दिवशी रद्द आहे.
पुणे त हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन १२२६३) १२, १६, १९, २३, २६ आणि ३० जानेवारी तसेच २ आणि ६ फेब्रुवारीला रद्द आहे. हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ते पुणे (ट्रेन १२२६४) ११, १५, १८, २२, २५ आणि २९ जानेवारी तसेच १ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन १२४९३) १४, २१, २८ जानेवारी तसेच ४ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. तर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ते मिरज (ट्रेन १२४९४) १२, १९, २६ जानेवारी तसेच २ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे.
यशवंतपूर एक्स्प्रेस ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन १२६२९) २३, २५ आणि ३० जानेवारी तसेच १ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ते यशवंतपूर एक्स्प्रेस (ट्रेन १२६३०) २६ आणि ३१ जानेवारी तसेच २ आणि ७ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. वास्को दा गामा ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन १२७७९) २० जानेवारी तसेच ३ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ते वास्को दा गामा (ट्रेन १२७८०) २२ जानेवारी तसेच ५ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे.
मैसूर ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन १२७८१) १२ आणि १९ जानेवारी तसेच २ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ते मैसूर (ट्रेन १२७८२) १५ आणि २२ जानेवारी तसेच ५ फेब्रुवारी या दिवशी रद्द केली आहे. यशवंतपूर एक्स्प्रेस ते चंडीगढ एक्स्प्रेस (ट्रेन २२६८५) २२, २४, २७ आणि ३१ जानेवारी तसेच ३ फेब्रुवारी या दिवशी रद्द आहे. चंडीगढ एक्स्प्रेस ते यशवंतपूर एक्स्प्रेस (ट्रेन २२६८६) २३, २७ आणि ३० जानेवारी तसेच ३ आणि ६ फेब्रुवारी या दिवशी रद्द करण्यात आली आहे.