पुणे – मुंबई-हुबळी मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे विभागाकडून चार विशेष ट्रेन (अनारक्षित) सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, बेळगावी, लोंडा आणि धारवाड असे थांबे घेत हुबळीला पोहचेल.
ट्रेन क्रमांक 01171 ही अनारक्षित विशेष ट्रेन मुंबई येथून दि. 3 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हुबळीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01173 अनारक्षित स्पेशल ट्रेन याच दिवशी मुंबई येथून दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.20 वाजता हुबळीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01172 अनारक्षित विशेष ट्रेन हुबळी येथून दि. 4 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुंबईला पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 01174 अनारक्षित विशेष हुबळी येथून याच दिवशी रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी मुंबईला पोहचेल. या विशेष ट्रेनला 20 एलएचबी कोचची असणार आहे. त्यामध्ये 19 सामान्य द्वितीय श्रेणी सह 1 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.