पुणे – परवानाधारक रिक्षाचालकांना लॉकडाऊन काळात राज्य शासन अनुदान देणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 5 हजारांहून अधिक अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या रिक्षा चालकांना 1, 500 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. याबाबत अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया आठवडाभरापूर्वी सुरू झाली. मात्र, सुरूवातीला रिक्षा चालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या. या अनुदानासाठी दाखल केलेल्या अर्जंपैकी बहुतांश अर्ज मान्य करण्यात आले आहेत.
अनुदान प्रक्रियेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या सुमारे 5 हजार 280 अर्जांवर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी सुमारे 4 हजार 750 हून अधिक अर्ज मान्य केले आहेत. तर सुमारे 520 अर्ज तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.