परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आयोजक गौरव म्हस्के यांचे आवाहन
मांजरी : येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. शैलेश नाना म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी बुद्रुक येथील के.के घुले विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी आणि रविवारी संपूर्ण दिवसभर हे शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गौरव गोपाळराव म्हस्के यांनी केले आहे.
या शिबिरात पुण्यातील संचेती हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशन चे डेंटल व आयुर्वेदिक स्पेशालिस्ट हॉस्पिटल व हडपसर येथील एच. व्ही. देसाई हॉस्पिटल ची टिम असणार आहे. पुणे आणि मुंबई येथील प्रसिध्द डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे.या महाआरोग्य शिबिरात सांधेदुखी, संधिवात, सांधे प्रत्यारोपण, कंबर दुखणे ,हाता-पायांना मुंग्या येणे ,
फ्रोजन शोल्डर, मणक्याचे जुने आजार, डायबेटिक निरोपॅथी, सायटिका पेन,लिगामेंट इंजुरी , टेनिस एल्बो, हीप आणि नी रिप्लेसमेंट व त्यानंतरचे आजार, प्रतिबंधात्मक दंत सेवा, मूलभूत संक्रमण नियंत्रण उपचार व निदान व प्रशिक्षणासह तोंडाचा कर्करोग तपासणी , रक्तस्राव ,मुळव्याध ,गुदफळ, फिशर, भगंदर ,डोळ्याची तपासणी , रेटिना तपासणी, डोळ्याचा चष्मा , मोतीबिंदू ऑपरेशन ,डोळ्यांच्या इतर समस्या व त्यावरील उपचार या सर्व आजारांचे मार्गदर्शन व त्यावरील उपचार या महाआरोग्य शिबिरात मोफत करण्यात येणार आहेत.
याशिवाय पुढील आजारासाठी ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे .या महाआरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार 23 व रविवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोफत आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य महारोग्य शिबिराचा अधिकाधिक लाभ घ्यावा या आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ,असे आवाहन महाआरोग्य शिबरायचे आयोजक गौरव म्हस्के यांनी केले आहे.
मांजरी परिसरात पहिल्यांदाच मोफत महाआरोग्य शिबीर
सामान्य माणसाला असाध्य आजारावरील तपासणी, उपचार मोफत करण्यासाठी हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल आहे. ‘माझ्या मांजरी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व गरजूंना तातडीने उपचार मिळण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा अनेकांनी लाभ घ्यावा. महाआरोग्य शिबिरात नागरिकांना मोफत उपचार आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांनतर ही गरजूंना औषधोपचारासाठी मदत लागली, तर ती मदत करण्यास मी कटिबद्ध आहे.’
ॲड. शैलेश नाना म्हस्के, आयोजक – महाआरोग्य शिबिर, मांजरी बुद्रुक.