Sukha Duneke : कॅनडातील मोगा जिल्ह्यातील दविंदर बंबीहा टोळीतील सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनीके( Sukha Duneke) याची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना 19 जून रोजी सरे येथे दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येसारखीच आहे. आरोपींनी सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनीके ( Sukha Duneke) यांच्यावर सुमारे 15 गोळ्या झाडल्या.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार,’दुनीके 2017 मध्ये बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतातून कॅनडाला पळून गेला होता. सुखदुल सिंगवर सात गुन्हे दाखल आहेत. पंजाब प्रदेश आणि आसपासच्या भागातील किमान 29 गुंड आहेत, जे कायद्यापासून वाचण्यासाठी भारताबाहेर आश्रय घेत आहेत. ते अनेक वर्षांपूर्वी भारतीय पासपोर्टवर किंवा बनावट प्रवासी कागदपत्रांच्या सहाय्याने नेपाळमार्गे दुसऱ्या देशात गेले होते.
सुखदुल सिंग दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता. सुखदुल सिंग दुनीके हा टार्गेट किलिंगसाठी ओळखला जात होता. खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई तीव्र करत राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) काल म्हणजेच बुधवारी (20 सप्टेंबर) अर्श डल्ला टोळीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
एनआयएने हरविंदर सिंग संधू उर्फ रिंडा आणि लखबीर सिंग संधू उर्फ लंडा यांच्यासह बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या माहितीसाठी रोख बक्षीस जाहीर केले होते. दुनिके पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये दविंदर बंबीहा टोळीला मदत आणि निधी पुरवून मजबूत करत होता. रिपोर्टनुसार, दुनिकेचा कल खलिस्तान समर्थक संघटनांकडेही होता. मात्र, तो मुख्यतः इतरांना खंडणीसाठी बोलावत असे आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये त्याचा सहभाग होता. दुनिके साथीदारांच्या मदतीने पंजाब आणि आसपासच्या राज्यात गुन्हे करत होता.