Entertainment – गार्गी फेम साई पल्लवी नेहमीच तिच्या साधेपणामुळे नेहमीची चर्चेत असते, साई पल्लवीचा नो मेअकप लूक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीत पडतो. साई पल्लवी साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साई पल्लवीच्या अभिनयासह तिच्या डांसरिंग स्किल्सही चाहत्यांना नेहमीच आवडतात. सोशल मीडियावर करोडोंच्या घरात तिचे फोल्लोवर्स आहे. अशात सोशलवर तिच्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो साई पल्लवीच्या लग्नचा आहे अशी अफवा सध्या सोशलवर सुरु आहे.
Adei 🤦♂️🤦♂️🤦♂️ pic.twitter.com/pk26NRPeFO
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) September 20, 2023
साई पल्लवीच्या फैनडम पेजवर एक फोटो व्हायरल होत आहे.या अभिनेत्री एका व्यक्ती सोबत दिसत असून दोघांच्या गळात फुलांचा हार दिसत आहे. दोघांच्या कपाळावर टीकाही दिसून येत आहे. या व्हायरल होतो मधून असे दिसत आहे की आताचा या दोघांचे सिम्पल लग्न झाले असावे. आणि त्यांनी फोटो सेशन केले असावे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,’अखेर साई पल्लवीने लग्न केले आणि हे सिद्ध केलं की प्रेमाचा कुठलाच रंग नसतो. तुला सलाम साई पल्लवी..!
चाहते अभिनेत्रीची स्तुती करत आहे. चाहते अंदाज लावत आहे की, अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलेय. चित्रपट दिग्दर्शक राजकुमार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केल्यावर हा फोटो समोर आला. यातील साई पल्लवीचा सहकलाकार शिवकार्तिकेयन असल्याचे त्याने सांगितले. त्यांचा चित्रपट येत आहे, ज्याचे नाव SK21 आहे आणि हा फोटो देखील या चित्रपटाच्या लॉन्च इव्हेंट दरम्यान घेण्यात आला आहे. फोटोमध्ये, राजकुमार साई पल्लवीसोबत आहे, तिच्या गळ्यात हार आहे, जी तिने पूजेदरम्यान घातली होती.
लग्नाच्या अफवांवर डायरेक्टर राजकुमार म्हणाले, हा लग्नाचा फोटो नसून एका सेरेमनीचा फोटो आहे. जेव्हा साऊथमध्ये कुठलाही चित्रपट लाँच होतो त्यावेळी अशा प्रकारचा फुलांचा हार घालतात. सोशल मीडियावर कुठल्याच प्रकराची अफवा पसरवू नका. कारण असे काहीच नाही म्हणजे साई पल्लवीच्या या फोटोला चुकीचे कॅप्शन देत अफवा पसरविण्यात आली. फोटोला चुकीचे कॅप्शन देत वायरल करण्यात आले आहे.