पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे गुरुवारी केवळ “कोवॅक्सीन’ डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
18 वर्षावरील सर्व नागरिकांना गुरुवारी कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून तर 20 टक्के ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 9 जूनला कोवॅक्सीनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या 18 वर्षांवरील नागरिकांना गुरूवारी 40 टक्के लस ऑनलाइन बिुकंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दि स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.