पुणे : महापालिकेच्या निवासी मिळकतीच्या अभय योजनेला आणखी महिना भराची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्या, नगरसेविका अर्चना तूषार पाटील यांनी यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नाही, त्यांनाही आता हा लाभ मिळू शकणार आहे.
पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पुणे महानगर पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्याची मुदत 25 जानेवारीला संपणार आहे.
या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा या उद्देशाने या योजनेची मुदत अजून 1 महिना वाढविण्यात यावी अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली होती. या मागणीस स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह सर्व स्थायी समितीने मंजुरी दिली.
या योजनेला मुदत वाढ मिळाल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. सध्या कोरोना मुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अभय योजने मुळे नागरिकांना दिलासा मिळेल असे नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले.