पुणे – पत्नीने दाजीच्या मदतीने बेदम मारहाण करून आणि त्यानंतर पतीचा गळा आवळून खून केला. ही घटना मुंढवा केशनवनगर येथे रविवारी घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गजेंदर चित्तरसिंग नायक (36) आणि अंजली चव्हाण (32) या दोघांना अटक केली आहे. या घटनेत कप्तानसिंग चव्हाण उर्फ नायक ( 37) यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मयत कप्तानसिंग हा बिगारी काम करतो. तर आरोपी गजेंदर हा त्याचा साडू लागतो. त्याच्या पत्नीने गजेंदर सिंग याच्यासह मिळून त्याला रविवारी बेदम मारहाण केली. यानंतर गळा आवळला. तो बेशुध्द पडल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषीत करण्यात आले.
वैद्यकीय अहवालात कप्तानसिंग याला बेदम मारहाण झाल्याचे तसेच गळा आवळला गेल्याने मृत्यू झाला असल्याचे निदाण झाले. यानंतर पोलिसांनी तपास करत दोघाही आरोपींना अटक केली. घरगुती वादातून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे करत आहेत.