पुणे – लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सोलापूर शाखा हडपसर आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत व्यावसायिक कर्ज व उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक चेअरमन सुभाष देशमुख उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायामध्ये उतरावे व या योजनेचा लाभ घेऊन व्याजाचा परतावा घ्यावा, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.
तरुणांनी व्यवसायात उतरून नवीन रोजगार तयार करून समाजाला पुढे न्यावे, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिटकॉन पुणे यांचे संचालक गणेश खामगल सर यांनी तरुणांनी व्यवसायात उतरण्यासाठी सकारात्मक विचार करून धाडस केले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे संचालक कांबळे, शाखा अधिकारी अंकुश गायकवाड, सल्लागार मंडळ, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेर सर यांनी केले. लोकमंगल समूहाविषयी माहिती शिवाजी माळी यांनी सांगितली तर आभार प्रदर्शन सचिन शेवाळे यांनी केले.