पुणे : पुरेशा सुविधांच्या अभावी नांदेड व छत्रपती संभाजीनगर व आज नागपूर येथे शासकीय रूग्णालयात मिळून जवळपास 79 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
या घटनांचा निषेध करत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) राज्यशासनात नैतिकता असेल घटनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच,
ते राजीनामा देत नसतील तर राज्याचे प्रमुख म्हणून या घटनेची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी हॉस्पीटल समोर हे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रकाश म्हस्के, डॉ. सुनिल जगताप, डॉ. शशिकांत कदम, किशोर कांबळे,
आशिष माने, शैलेश राजगुरू, मनाली भिलारे, फहीम शेख, सागर खांदवे, अश्विनी परेरा, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.