Asian Games 2023 ( Men’s javelin throw) : भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 88.88 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, भारतीय किशोर जेनाने 87.54 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले.
𝑲𝒂𝒓 𝑯𝒂𝒓 𝑴𝒂𝒊𝒅𝒂𝒏 𝑭𝒂𝒕𝒆𝒉💪🏻#GOLD🥇 FOR THE G.O.A.T@Neeraj_chopra1 conquers #AsianGames2022 for the second time with a season best throw of 88.88!
Take a bow King👑! You have done it💪🏻
Congratulations on your #HallaBol performance 🥳#Cheer4India#JeetegaBharat… pic.twitter.com/m7NhwV8o6X
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
नीरजने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर किशोरची ही पहिलीच आशियाई स्पर्धा असून त्याने रौप्यपदक पटकावले. किशोर जेनाचे हे कोणत्याही स्पर्धेतील पहिले पदक आहे. जपानच्या गेन्की डीनने 82.68 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धा 1951 पासून होत आहेत. भारताच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावण्याची 72 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भालाफेक प्रकारात भारताची आता पाच पदके झाली आहेत. या दोन पदकांच्या आधी, परसा सिंगने 1951 च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य, गुरतेज सिंगने 1982 च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक आणि 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारताने दोन पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.