पुणे – मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील नव्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.तर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडून काढून घेत ते हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांना देण्यात आले आहे.तसाच बदल बुलढाणा जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडील पालकमंत्रिपद काढून दिलीप वळसे पाटील यांच्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वर्धाच्या पालकमंत्र्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीनार यांच्याऐवजी आता धर्मरावबाबा अत्राम यांना देण्यात आली आहे. धाराशिव आणि परभणी या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे होते. त्यातील परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे.
सुधारित 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार