पुणे (प्रतिनिधी) – शहर परिसरात दुचाकी वाहने चोरणार्या उच्चशिक्षीत तरूणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधीत तरूण उच्चशिक्षीत असून व्यसनाच्या अधिन गेल्याने त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
प्रशांत प्रभाकर कान्हेकर (४७, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहकारनगर पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान धनकवडीतील सावरकर चौक परिसरात एकजण संशयीतरित्या थांबला असून त्याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती अंमलदार अमोल पवार, विशाल वाघ यांना मिळाली.
त्यानूसार पथकाने सापळा रचून कान्हेकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्यानूसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९५ हजारांचा तीन दुचाकी जप्त केल्या.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील , सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे,
यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, बजरंग पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, सागर कुंभार, नवनाथ शिंदे यांनी केली.