pune news : मार्केट यार्डातील बिस्कीट, चॉकलेटच्या गोडावून आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. गोडावूनच्या खिडक्या पत्र्या लावून बंद आणि माल पूर्ण भरलेला असल्याने आग आटोक्यात आणायला अग्निशाकाल दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अग्निशामक दलाचे तीन अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर साधारण अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आहे.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्डात गेट नंबर १० जवळ गजराज डिस्ट्रीब्युटर्स तळ मजला आणि पहिला मजला अशी दोन मजल्याची हे दुकान आणि गोडावून आहे. दुकानातील गोदामात मोठ्या प्रमाणावर बिस्कीट, चॉकलेट सारखे डेअरी प्राॅडक्ट ठेवण्यात आले आहेत.
शनिवारी दुपारी गोडावून मध्ये सर्व माल गच्च भरण्यात आला होता. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानपणे गोडावून मध्ये आग लागली. या घटनेची माहिती मिळतात साधारण ३ वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र गोडावून थंड ठेवण्यासाठी खिडक्या पत्रे लावून पूर्ण पणे बंद करण्यात आल्या होत्या.
यामुळे गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. धूर मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना आगी पर्यंत जाण्यास अडचण येत होती. यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी गोडाऊनच्या खिडक्यांची पत्रे आणि शटर हे कटावणीच्या सहाय्याने तोडले.
यानंतर अडीच तासांच्या प्रयत्नातर आग आटोक्यात आणून गोडाऊनचे कुलिंग करण्यात आले. दुकानातील साहित्य आगीत जळाले असून, सॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
यावेळी गंगाधाम, कोंढवा आणि कण्ट्रोल रूम येथील ६ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. स्टेशन ड्युटी ऑफिसर पंकज जगताप, सुनील नाईकनवरे, प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली शफिक सय्यद, अरुण वाईकर, राहुल नलावडे, मोरे, गारगोटे,
लोणार आदी जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तसेच सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात शनिवारी सकाळी एका बंद दुकानात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.