पुणे – आदिशक्तीची उपासना ही आपल्या परंपरेची महत्त्वाची ओळख आहे. या नवरात्रीच्या काळात विशेषतः महिलांसाठी अधिकचा परतावा देणारी आदिशक्ती ठेव योजना लोकमान्य सोसायटी तर्फे सादर करण्यात आली आहे.
आदिशक्ती ठेव योजनेमध्ये गुंतवणूकदारांना ९.६० टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. ही योजना अठरा महिन्यांसाठी असून यामध्ये महिलांना ०.५० टक्के इतका अधिकचा व्याजदर मिळणार आहे. महिलांसोबत ज्येष्ठ नागरिकांना देखील अर्धा टक्के अधिकच्या व्याजदराचा लाभ या योजनेद्वारे घेता येईल. ठेवीदार-सभासद या योजनेमध्ये किमान दहा हजार रूपयांची गुंतवणुक करू शकतात.
सोप्या गुंतवणुक प्रक्रियेसह मर्यादित कालावधीसाठी चांगला परतावा मिळवून देणाऱ्या या योजनेमध्ये नवरात्रीच्या काळात अधिकाधिक गुंतवणुक करून लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे करण्यात आले आहे.
तसेच गुंतवणुकदार घरबसल्या ‘डिजिटल प्लॅटफॉम’च्या (www.lokmanyaonline.com) माध्यमातून देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ठेवीदार-सभासद-गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती `लोकमान्य सोसायटी`तर्फे देण्यात आली आहे.