उंब्रज – लोकमान्य सोसायटी सहकार चळवळीला मजबूत करणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या नेतृत्वात ती आणखी मजबूत होईल. या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने उद्योग जगताला देखील मोठी मदत मिळतेय, यापुढेही ती मिळेल असा विश्वास साताऱ्याचे खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थलांतरित उंब्रज, (ता. कराड) शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी लोकमान्य संस्थापक तरूण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर, संस्थेचे संचालक गजानन धामणेकर, संस्थेच्या पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, सहायक विभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले की, उंब्रज येथील लोकमान्य सोसायटीमुळे या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले आहे. किरण ठाकूर यांनी सांगितले की, आज लोकमान्य समूहावर सभासद, ग्राहक व नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे दहा कोटी सभासद असलेली सोसायटी ही देशभरात पहिल्या क्रमाकांची सोसायटी ठरली आहे.
प्रारंभी लोकमान्य संस्थेच्या वतीने प्रवीण जाधव, सुर्यकांत जाधव, रूपाली गणेश चव्हाण, मोहन चौधरी, सर्जेराव भोंगाने, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी प्रकाश मुसळे, मोतीराम ठोके, अजित पवार, कमलाकर पाटील. यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनील मोरे, विभागीय मुख्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सचिन होडगे, विपणण अधिकारी आदित्य भेंडे, सचिन झगडे उपस्थित होते