पुणे – २२ जानेवारी रोजी अयोध्येत भव्य अशा श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हा साऱ्या देशांसाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण होता. अशा पवित्र क्षणाचे औचित्या साधून `लोकमान्य सोसायटी`ने रघुकुल निवेश ही ठेव योजना सादर केली आहे.
१३ महिने गुंतवणुक कालावधी असलेल्या या योजनेसाठी ९.५० टक्के इतका व्याजदर असून किमान गुंतवणूक दहा हजार रूपयांपासून करता येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्के इतका अधिकचा व्याजदर देखील आहे.
गुंतवणुकदार घरबसल्या `डिजिटल प्लॅटफॉम`च्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com) या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. `लोकमान्य सोसायटी`च्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ठेवीदार-सभासद-गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती `लोकमान्य सोसायटी`तर्फे देण्यात आली आहे.