नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (up Election) जर भारतीय जनता पार्टीचा (bjp) विजय झाला तर आमचे सरकार महिलांना वर्षाला दोन गॅस सिलिंडर मोफत देईल असे आश्वासन निवडणुकीच्या प्रचारात देण्यात आले होते. त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नव्हती. मात्र दिवाळी तोंडावर आली असताना आणि राज्याचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी उच्चस्तरिय बैठकीत या योजनेच्या संदर्भात आढावा घेतला असून योजना लागू करण्याच्या संदर्भातील निर्देश त्यांना दिले आहेत.
उत्तर प्रदेशात (up news) उज्ज्वला योजने (ujjawala sceame) अंतर्गत 1 कोटी 75 लाख गॅस कनेक्शन (gas cylinder ) देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत दिवाळीच्या अगोदर जे लोक गॅस सिलिंडर घेतील त्यांना सिलिंडरची पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
दरम्यान, योजनेसाठी निधी कसा जमा करायचा यावरही बैठकीत अगोदर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिवाळीप्रमाणेच होळीच्या अगोदरही अशाच प्रकारे एक सिलिंडर मोफत दिले जाणार आहे.
उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला गेला होता, त्यात या योजनेसाठी 3300 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र योजना अद्याप सुरू करण्यात आली नव्हती.आता दिवाळी निमित्ताने का होईना सरकारला या योजनेची आठवण आल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गॉड होणार आहे.