पुणे – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती (23 जुलै) ते पुण्यतिथी (1 ऑगस्ट) चे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली व विनामूल्य आहे.
ही स्पर्धा दोन गटांमध्ये असणार आहे. पहिल्या वयोगटात 5 वी ते 7 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून 1) मला भावलेले लोकमान्य टिळक, 2) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व 3) लोकमान्यांच्या विचारांचे मूल्य शताब्दी नंतर.. हे विषय आहेत.
दुसऱ्या वयोगटात 8 वी ते 10 वी तील विद्यार्थ्यांसाठी असून 1) लोकमान्य टिळक – व्यक्ती नव्हे प्रगल्भ राष्ट्राभिमान, 2) लोकमान्य टिळक – व्यक्ती नव्हे एक चिरंतन विचार आणि 3) लोकमान्य टिळक – एक क्रांतीकारी युगपुरूष असे निबंधासाठी विषय आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी उपरोक्त विषयावरील निबंध लिहून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या नजीकच्या शाखेमध्ये 5 ऑगस्ट 2022 पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या नजीकच्या शाखेशी किंवा 9022173597 या क्रमांकावर संपर्क साधावा.