पुणे – मागील अडीच दशकांहून अधिक वर्षांपासून सुरक्षितता सर्वप्रथम हे बिरुद अभिमानाने बाळगणारी, गुंतवणूकीवर आकर्षक व्याजदरासह निश्चित परताव्यासाठी विश्वासार्ह संस्था म्हणून ग्राहक, सभासद व गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेल्या लोकमान्य सोसायटीच्या सर्व नवीन ठेव योजनांवरील व्याजदर 1 सप्टेंबर 2021 पासून 1 टक्कांपर्यंत कमी होणार आहेत.
तेव्हा ग्राहक, सभासद व गुंतवणुकदारांनी व्याजदर कमी होण्यापूर्वी गुंतवणूकीचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे करण्यात आले आहे. सभासद, ग्राहकांना उपलब्ध विविध गुंतवणूक योजनांमध्ये ‘ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉम’च्या माध्यमातून घरबसल्या पैसे गुंतविता येतील.
तसेच “लोकमान्य सोसायटी”च्या कोणत्याही शाखेत किंवा ग्राहक 1800 212 4050 या क्रमांकावर संपर्क साधून सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती “लोकमान्य सोसायटी”तर्फे देण्यात आली आहे.