पुणे –टिळक रस्त्याहून स्वारगेटकडे जाणारा रस्त्यावर खोदकाम केले होते. याठिकाणी आता बॅरिकेड ठेवण्यात आले असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रहदारीच्या रस्त्यावर हे बॅरिकेड ठेवल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
शहरात विविध ठिकाणी विकासकामांसाठी रस्त्यांची खोदकामे पालिकेने केली होती. मात्र कामांनंतर खडी, माती टाकून रस्ता तात्पुरता दुरुस्त केला आहे. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे दिसू लागले आहे. तर बहुतांश ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने रस्ते दुरुस्त न केल्याने असमान रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, टिळक चौक, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठेचे रस्ते टिळक रोडवर एकत्र येतात. यारस्त्यांवर असणारी महाविद्यालये आणि शाळांमुळे रहदारीदेखील वाढली आहे. पण, रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिळक रस्त्याकडून सदाशिव पेठेकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम केले होते. तेथे आता माती आणि खडी रचल्याने बॅरिकेड ठेवण्यात आले आहेत. मात्र, वळणावर असणाऱ्या या बॅरिकेडमुळे नागरिकांना सोयीच्या ऐवजी अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे.