पुणे – नवे शिक्षक – नवे पुस्तक, पण वर्ग ऑनलाइन

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षातही शाळा ऑनलाइन सुरू करण्यात आल्या. ऑनलाइन प्रार्थना, स्वागतगीत, राष्ट्रगीत, गप्पागोष्टींसह आनंदी वातावरणात ऑनलाइन शाळा भरल्या.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन औक्षण करून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. विविध उपक्रमांद्वारे ऑनलाइनद्वारेच प्रवेशोत्सवच साजरा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलल्याचे आढळून आले.

करोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंदच होत्या. शिवाय परीक्षाही न घेता विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे सरसकट पास करण्यात आले. करोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधा बालकांना पोहोचण्याची भीती असल्याने यंदाही ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या.
शाळांनी शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पालकांच्या ऑनलाइन बैठका घेऊन शैक्षणिक कॅलेंडरबाबत सूचना दिल्या.

विद्यार्थ्यांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप अपडेट करून ऑनलाइन शिक्षणाची तयारी करत शैक्षणिक तासाला प्रारंभ झाला. गुगल मीट, झूम ऍपसह इतर पद्धतीचा अवलंब करत शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला. खासगीसह इतर शाळांमधील विद्यार्थी गणवेशात ऑनलाइन शाळेत सहभागी झाल्याचे दिसले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.