पुणे – राज्यासह पुणे जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझा शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे. दि. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान होईल. सर्व शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक संध्या गायकवाड यांनी केले आहे. शाळेप्रती उत्तरदायित्याची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून स्पर्धात्मकतावरण तयार होऊन विद्याव्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानात सहभागी होणऱ्या शाळांना १ लाखांपासून ते ५१ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील सार्धेत शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रथम क्रमांकासाठी ३ लाख द्वितीयसाठी २ लाख, तर तृतीयसाठी १ लाख रुपये पारितोषिक दिले जाईल,
जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस ११ लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख, विभागस्तरावर प्रथम २१ लाख द्वितीय १२ लाख आणि तृतीयसाठी लाख रुपये, तर राज्य पातळीवर प्रथम ५१ लाख, द्वितीय २१ लाख आणि तृतीयसाठी १९ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही एवढेच बक्षीस दिले जाणार आहे.