तळेगाव दाभाडे – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या १० जानेवारीस होत असुन ते यशस्वी करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. या संमेलनाची जय्यत तयारी झाली आहे. असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी येथे केले.
तळेगाव शहरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे, पदाधिकारी, कलाकार, कार्येकर्ते, सभासद व संस्था प्रतिनिधी, यांची विशेष सभा रविवारी (दि. ३१) येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष भोईर बोलत होते.
त्याप्रसंगी शास्त्रीय गायक सुरेश साखवळकर, तळेगाव शाखेच्या संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, पुणे पीपल्स बॅकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, कृष्णा कारके, हरिश्चंद्र गडसिंग आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री साखवळकर म्हणाले की, तळेगाव नगरी ही ऐतिहासिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली नगरी असुन या नगरीत साहित्य, संगीत, कला, नाट्य आदी बहरले आहे.
संमेलनात “चला हवा येऊ द्या” चे ज्येष्ठ कलाकार येणार आहेत. असे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले. तर हे नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही पुर्णपणे तयारीत आहोत. असे तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी यावेळी सांगितले. सम्मेलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मीनल कुलकर्णी, शुभांगी कार्ले, सुहास धस, नंदकुमार कोतुळकर आदींनी मोलाच्या सुचना यावेळी केल्या. या सभेचे सुत्रसंचालन पत्रकार राजेश बारणे यांनी तर स्वागत प्रसाद मुंगी यांनी केले. मिलिंद निकम यांनी आभार मानले.