पुणे – पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय स्थानक ते हिल व्ह्यू पार्क येथील कारशेड या मार्गावर मेट्रोची ताशी 90 किलोमीटर वेगाची चाचणी शनिवारी घेण्यात आली. त्यामुळे आता लवकरच 90 किमी प्रतिवेगाने धावणाऱ्या मेट्रोतून नागरिकांना प्रवास करता येणार आहे.
महामेट्रोकडून पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. सध्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर ट्रॅकसह तारांच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आसून, गरवारे स्थानकाचे काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर मेट्रोकडून विविध चाचण्या घेण्यात येत आहेत.
यासह पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातील कारशेडसह स्थानकांची कामे देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.