अश्लिल छायाचित्र, शिविगाळ केलेला मेसेज केला व्हायरल
ऍपद्वारे लोन मिळवून देण्याचा अधिकार नाही ः पोलिसांची माहिती
पुणे – लोन ऍप कंपनीच्या नावे अश्लिल छायाचित्र व शिविगाळ केल्याचा मेसेज तरुणाच्या मित्र व नातेवाईकांना पाठवण्यात आला. बदनामी झाल्याने या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ए. पी. प्रकाशन (22, रा. माणिकबाग) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रकाशन याचा आतेभाऊ नाईजिल राजन (33, रा. औंध) यांनी रीरप श्रेरप लोरिपू विरुद्ध तक्रार केली आहे. प्रकाशान याच्यावर केरळ येथे मूळ गावी अंत्यविधी केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. प्रकाशन हा पुण्यात शिक्षणासाठी आला होता.
दरम्यान, त्याला ऍडमिशन मिळाले नव्हते. त्यामुळे तो एका पेट्रोलपंपावर काम करत होता. दरम्यान, “असान लोन ऍप कंपनी’तून कॉल आला होता. त्यातून पुढे प्रक्रिया झाल्यानंतर हा प्रकार घडला.
मागील वर्षी लोन ऍप कंपनीच्या नावाने धमकी तसेच बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी काही गुन्हे दाखल आहेत. यंदाही अशा तक्रारी आल्या आहेत. या कंपन्या बेकायदा पद्धतीने लोन देत आहेत. त्यांना ऍपद्वारे लोन देण्याचा अधिकार नाही. एखाद्याने लोनसाठी अर्ज केल्यावर अर्ज भरताना कंपनीला सर्व परवानग्या देऊन टाकता. यामुळे कंपनीला तुमच्या सर्व सोशल मीडिया व इतर ऑनलाइन असलेल्या माहितीचा ऍक्सेस मिळत असतो. याचाच नंतर गैरवापर करुन त्रास दिला जातो.
डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन
एका लोन कंपनीच्या नावाने प्रकाशन याच्या नातेवाईकांना मेसेज व छायाचित्र पाठवण्यात आले होते. बदनामी झाल्याने प्रकाशन याने आत्महत्या केली. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
प्रमोद वाघमारे,पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस स्टेशन